"या' विश्रांतीमूळे ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अधिक मिळणार वेळ

कोरोना या व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. याचा क्रिडा विश्‍वाला देखील मोठा फटका बसला असून या आजारामुळे सर्वानाच घरी थांबून सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे. ही विश्रांती ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत नेमबाज तेजस्विनी सावंतने व्यक्त केले.

दोहा येथील आशियाई स्पर्धेत भारताचे टोक्‍यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात तेजस्विनीने स्थान निश्‍चित केले आहे. आलिम्पिक व राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेची तयारी करत असतांना कोरोनामुळे देशभरात लागलेले "लाॅकडाऊन' मध्ये तेजस्विनी तिच्या माहेरी कोल्हापुरात आहे.

ऑलिम्पिक लांबणीवर पडल्यामुळे वर्षभराचा काळ आणि आगामी आव्हानांविषयी तेजस्विनीशी बोलतांना म्हणाले, की कोरोना मुळे माझ्या तयारीवर कोणताही परिणाम झालेला नाही. मी घरातच नियमीत व्यायाम करत आहे. मागील महिन्यात विमानाने दिल्लीवरून आल्यानंतर मी स्वःताला घरात विलगीकरण केले होते. विलगीकरण संपल्याने माझ्या घराजवळील नेमबाजी केंद्रावर जाऊन मी सराव करत आहे.

कुटूंबाला वेळ देता येत आहे लाॅकडाऊनमुळे सर्व स्पर्धा तसेच कुठे जात येत नसल्याने कुटूंबासोबतच लग्न झाल्यापासून गेल्या चार वर्षानंतर ऐवढा वेळ माहेरी देता आला नाही. त्यामुळे अशा स्थितीत हा वेळ कुटुंबासोबत देण्याची चांगली संधी मिळाली आहे. स्वयंपाकघरात पदार्थ बनवणे यांसारख्या गोष्टींनाही वेळ देणे, जोडीला सराव करणे असा वेळ दिला जात आहे.

Sharing