कोरोना'शी लढणाऱ्या 'देवदुता'चं कर्तव्याला प्राधान्य; आईला 'व्हिडीओ कॉल'मधून अखेरचा निरोप

जयपूर | नर्सिंग इंचार्ज म्हणून कार्यरत असलेल्या जयपूरच्या 'देवदुता'ने आईच्या निधनानंतरही कर्तव्याला प्राधान्य दिलंय. व्हिडीओ कॉलमधून ते आईच्या अंत्यसंस्कारांमध्ये सहभागी झाले.

आई, मी तुझ्या चितेला अग्नी देऊ शकलो नाही, याचे मला वाईट वाटतं, अशा भावना राममूर्ती यांनी व्यक्त केल्या आहेत. 'कोरोना'ग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी आईच्या अंत्यदर्शनालाही न जाण्याचा निर्णय त्यांनी जड अंत:करणाने घेतला. लोकांचे प्राण वाचवणं माझं कर्तव्य आहे, असं राममूर्ती यांनी म्हटलं आहे.

कोरोनाशी झुंजणाऱ्या रुग्णांना सोडण्याऐवजी आईच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा मार्ग राममूर्ती यांनी निवडला. राममूर्ती राजस्थानमधील करौलीतील रानोली गावचे रहिवासी. त्यांच्या 93 वर्षीय मातोश्री भोली देवी यांचे वृद्धापकाळाने निधन झालं.

दरम्यान, तीन मुलं लॉकडाऊनमुळे तेलंगणात अडकल्यामुळे सोलापुरात राहणाऱ्या वृद्धेने पतीला मुखाग्नी दिल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आली होती.

Sharing