विश्वचषक नेमबाजी स्पर्धा अखेर रद्द

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विश्वचषक नेमबाजी स्पर्धा अखेर रद्द करण्यात आली आहे. 'आयएसएसएफ' आणि भारतीय रायफल असोसिएशनने (एनआरएआय) ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

विश्वचषक स्पर्धा १५ ते २६ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती. पण स्पर्धेला सुरुवात होण्याच्या चार दिवसआधीच ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे रायफल आणि पिस्तूल प्रकाराची स्पर्धा ५ ते १३ मे दरम्यान आणि शॉटगन प्रकाराची स्पर्धा २ ते ९ जूनदरम्यान होणार होती. ''करोनामुळे रायफल-पिस्तूल तसेच शॉटगन विश्वचषक स्पर्धा संयोजकांना रद्द करावी लागली आहे. या दोन्ही स्पर्धा नवी दिल्लीत होणार होत्या,'' असे जागतिक नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) म्हटले आहे.

Sharing