हॉटेल 5G जवळ मोठा अपघात; अपघातात तीन जण ठार ?

Beed

हॉटेल 5G जवळ मोठा अपघात; अपघातात तीन जण ठार ?

बीड प्रतिनिधी 

बीड बायपास वर हॉटेल फाईव्ह जी जवळ मोठा अपघात झाला असून या अपघातात तीन जण ठार झाले तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक महिती सामोर येत आहे.

याबद्दल मिळालेली अधिक माहती अशी की, मांजरसुंबा कडून औरंगाबाद कडे आयशर टेम्पो जात असताना त्याला रस्ता न समजल्याने त्याने बायपास वरून शहराकडे टेम्पोचा टर्न घेतला यामुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटला व तो अपे रिक्षाला जाऊन धडकला, नंतर दोन ते तीन मोटरसायकल यांना धडक दिली, नंतर गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या छोट्या हत्तीला ही धडक दिली, या अपघातात तीन जण ठार झाल्याची प्रथम दर्शनी लोकांकडून माहिती मिळत आहे. तर दहा ते बारा जण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याचे समजते. जखमी रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असल्याची माहिती ही समोर येत आहे.

Sharing