धार्मिक स्थळामध्ये रक्तरंजित राडा; तिघे गंभीर उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल
Beed
बीड प्रतिनिधी
जुन्या भांडण्याच्या कारणाहून शहरातील एका धार्मिक स्थळात पाच ते सात जणांच्या टोळक्याने तीन व्यक्तीवर शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज दुपारी तीन च्या सुमारास बुंदेलपुरा भागात घडली आहे. पवित्र धार्मिक स्थळात ही घटना घडल्यामुळे समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे, तीन पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून शहरातील नागरिकांनी तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून सदर घटनेचा निषेध करत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे, शहरात दिवसा ढवळ्या धार्मिक स्थळात झालेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.