जिल्हा रुग्णालयाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर;रक्ताची सॅम्पल न घेताच रिपोर्ट कसा?
जिल्हा रुग्णालयाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर;रक्ताची सॅम्पल न घेताच रिपोर्ट कसा?
बीड प्रतिनिधी
"आंधळ दळते कुत्र पीठ खाते" अशी जिल्हा रुग्णालयाची सध्या अवस्था झालेली आहे. यानिमित्ताने जिल्हा रुग्णालयाचा कारभार चव्हाटयावर आला आहे,जिल्हा रुग्णालयाचा कारभार कधी सुधारणार हा प्रश्नचिन्ह कायमच म्हणावा लागेल कारण रक्ताची तपासणी न करताच रुग्णाला रक्त तपासणीचा रिपोर्ट दिला असा आरोप रुग्णाच्या वतीने करण्यात आल्याने जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
याबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की ,जिल्हा रुग्णालयातील आज सकाळी सहा वाजता शेख नामक व्यक्ती सहा नंबर वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आला होता त्याच्यावर उपचार सुरू होता मात्र त्याचा रक्त सॅम्पल न घेताच रक्त तपासणीचा रिपोर्ट आला यामुळे हा रिपोर्ट माझा नाही असा आरोप करत शेख यांनी हा रिपोर्ट माझा नाही हा रिपोर्ट माझ्या कागदाला जोडला कसा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे हा रिपोर्ट नक्की कुणाचा आणि शेक यावर काय उपचार होणार?हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. रक्त तपासणीच्या रिपोर्टवर रुग्णावर उपचार केले जात आहे मात्र रिपोर्टच चुकीचे असेल तर नेमकं त्या रुग्णांवर काय उपचार होणार हा संशोधनाचा विषय बनला आहे, हा रिपोर्ट नक्की कोणाचा? असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्हा रुग्णालयातील कामकाज कसं होत असेल याचा अंदाज आपण लावू शकतो, या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या वतीने केली जात आहे.