सासरच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय महिलेची आत्महत्या

Beed

सासरच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय महिलेची आत्महत्या

बीड प्रतिनिधी

शहरातील अंकुश नगर भागात राहणाऱ्या संगीता संजय खरात वय वर्ष 26 या महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दि .18 ऑगस्ट रोजी उघडकीस आली ,यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, सासरच्या लोकांकडून दरवेळेस लाताबुक्याने मारहाण करत माहेरहून चार लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला मारून टाकेल अशी धमकी देण्यात येत होती यामुळे दरवेळेस होणाऱ्या त्रासाला कंटाळून संगीता संजय खरात या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्यादीत म्हटले आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शहादेव सुखदेव अडागळे यांच्या फिर्यादीवरून 1)संजय खरात 2)कल्याण खरात 3)कोंडाबी खरात 4)विजय खरात 5)दिपाली खरात यांच्या विरोधात हुंडाबळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Sharing