मंडळ अधिकारी सचिन सानप यांच्यावर एसीबीची कारवाई 

Beed

मंडळ अधिकारी सचिन सानप यांच्यावर एसीबीची कारवाई 

एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला 

बीड प्रतिनिधी 

अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती दीड लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.21) दुपारी बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. 

बीड जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रकार वाढले असून शासकीय कामासाठी काही भ्रष्ट अधिकारी पैसे घेताना दिसत आहेत. बीडचे मंडळ अधिकारी सानप यांना आज दिड लाखाची लाच घेताना एसीबीने पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलात करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Sharing