धारूर तालुक्यातील आवरगावात गावबंदी.
Dharur

धारूर तालुक्यातील आवरगाव येथे कोरोनाच्या भितीने बाहेरून येणार्या प्रवाशांना गांवबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन तालुक्यातील आवरगाव ग्रामस्थांनी बाहेरून येणार्या प्रवाशांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. येथील सरपंच आमोल जगताप रविन्द्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गावात जाणार्या मुख्य रस्त्यावर अडथळा लावुन रस्ता बंद करण्यात आला आहे.
