पोलिसांना चहा,पाणी,व टिफीनची पूर्तता केली जाधव परिवाराने.
Beed

पोलिसांना चहा,पाणी,व टिफीनची पूर्तता केली जाधव परिवाराने बीड/प्रतिनिधी कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर लोकांची सेवा करणारे आपल्या जिवाची परवा न करता २४ तास लोकांच्या सेवेत हाजर असणारे पोलिस कर्मचारी यांना सुध्दा आपले कुटुंब आहेत मात्र ते आपल्या कुटुंबाला बाजुला ठेऊन आज ते लोकांची सेवा करत आहेत.
बीड जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला होता कर्फ्यु मध्ये आपले कर्तव्य पार पाडणारे पोलिस कर्मचारी दिवस भर काम करत आहेत हे लक्षात घेऊन जाधव परिवारातुन विद्या जाधव व अॅड.विशाखा जाधव यांनी पेठ बीड भागात असणाऱ्या पोलीस बांधवांना व महिला पोलिसांना चहा, पाणी, व टिफीन ची सोय केली.
जर सर्वांनी पोलिस प्रशासनास अशीच मदत केली व पोलिस कर्मचार्यांच्या आदेशाचे पालन केले तर नक्कीच कोरोनाला आपण हकलुन लावु शकतो.
