व्यवसाय आणि कारकीर्द
तुमच्या इच्छाआकांक्षा पूर्ण व्हाव्या ह्यासाठी तुम्ही अगदी निर्धास्तपणे आमच्यावर अवलंबून राहा. खासकरून तुम्ही व्यवसाय करत असता, तेव्हा लोकांची नाडी तुम्हाला ओळखता येणे फार महत्वाचे असते. त्यांना काय आवडते, काय आवडत नाही, एखादी वस्तू त्यांनी विकत घेण्यामागे किंवा नाकारण्यामागे कोणते कारण आहे / होते, हे तुम्हाला कळणे आवश्यक असते. आत्ताच्या गळेकापू स्पर्धेच्या जगात तुम्ही स्वतःच्या प्रतिस्पर्ध्याच्या एक पाऊल पुढेच असणे गरजेचे असते. असे करताना केवळ नाविन्यपूर्ण शोध लावून किंवा वस्तू तयार करून भागत नाही तर उपलब्ध सामग्री कमीतकमी खर्च होईल अशा प्रकारे वापरावी लागते. आपल्या कारकीर्दीच्या बाबतीतही असेच असते. अदृष्टात काय वाढून ठेवले असेल किंवा आपल्या व्यावसायिक कारकीर्दीच्या संदर्भात ग्रह काय सूचना देत आहेत, ह्याची किंचित कल्पना जर आपल्याला आधीपासूनच असली तर त्याची आपल्याला खूपच मदत होऊ शकते.