मुर्खांसोबत सरकार चालवता चालवता अजित पवारांना लोक पण मूर्ख वाटायला लागलेत?

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या वांद्रे येथील मातोश्रीबाहेरील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. चहावाला राहत असलेल्या इमारतीमधील चार जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तसंच काही सुरक्षा रक्षक जे या चहावाल्याच्या स्टॉलवर गेले होते त्यांना पूर्वकाळजी म्हणून अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी राज्यातील सरकारच्या कारभारावरच उपहासात्मक टीका केली आहे.

मूर्खांन सोबत सरकार चालवता चालवता अजित पवारांना लोकं पण मूर्ख वाटायला लागली की काय?, असा सवाल करत निलेश राणेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर, हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं.

महाराष्ट्र सरकार उत्तम काम करतय. नाव ठेवायला जागाच ठेवली नाही. उद्या जाहीर करतील हा चहावाला त्याची किटली परदेशातून घेऊन आला होता पण आम्ही किटली सकट त्याला क्वारंटाईन मध्ये पाठवला, असंही राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईत सोमवारी दिवसभरात 57 नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा 490 वर गेला आहे.

Sharing