आर.बी. अट्टल कॉलेजचा निकाल ९८ टक्के, विश्वजीत सर्वप्रथम

Georai

आर.बी. अट्टल कॉलेजचा निकाल ९८ टक्के, विश्वजीत सर्वप्रथम

गेवराई/प्रतिनिधी 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद यांनी  फेब्रुवारी -मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी चा निकाल जाहीर झाला असून र. भ. अट्टल कनिष्ठ महाविद्यालयाचा  विश्वजीत राजेंद्र गोडबोले हा ८६.८४ टक्के घेऊन सर्वप्रथम आला आहे.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९८.१९ टक्के, वाणिज्य ९७.८२ टक्के तर कला शाखेचा ८३.१९ टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयाचा सरासरी निकाल  ८९.८३ टक्के एव्हढा लागला.विज्ञान शाखेत गोडबोले विश्वजीत राजेंद्र - प्रथम-८६.८४, गवळी योगेश संतोष-द्वितीय -८५.६९, मोटे रेणू इंदरराव -द्वितीय -८५.६९ , जांगिड वैष्णवी लक्ष्मीनारायण -तृतीय-८५.१५ टक्के, कला शाखेतून प्रथम तटू किरण विश्वंभर ८८, द्वितीय    -हुलजुते  श्रध्दा गणेश ८०.१५, तृतीय -शेलकर अभिषेक रामप्रसाद ७७.३८ आणि वाणिज्य शाखेतून प्रथम कोळी कोमल भगवान ८३.२३ टक्के , द्वितीय -यादव वैभव भगिरथ ७६.७५, द्वितीय -घोडके निकिता गोपीनाथ ७६.७५ टक्के, तृतीय - काळे वैष्णवी राजेंद्र ७५.५३ टक्के गुण मिळविले आहेत. या यशाबद्दल मशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष माजी आमदार अमरसिंह पंडित,  महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, उपप्राचार्य मेजर सांगळे व्ही.पी., कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अशोक जगताप, पर्यवेक्षक प्रा. राजेंद्र राऊत, प्रबंधक बी.बी. पिंपळे, कार्यालय अधिक्षक भागवत गौडी, प्राध्यापक, सर्वत्र प्रशासकीय कर्मचारी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Sharing