अंजली अंगरकेचे सुयश!
Beed

अंजली अंगरकेचे सुयश!
बीड/प्रतिनिधी
शहरातील रहिवासी व कराड येथील विद्यालयात शिक्षण घेत असलेली अंजली शिवाजी अंगरके हिने बारावी बोर्ड परीक्षेत वाणिज्य शाखेतून घवघवीत यश संपादन केले आहे.
अंजली अंगरके हिला 78.47 टक्के गुण मिळाले असून गुणवंत विद्यार्थींनी म्हणून ओळख आहे. तीच्या या यशाबद्दल तीचे पत्रकार उत्तम ओव्हाळ, गौतम ओव्हाळ, रितेश ओव्हाळ, निलेश डोळस, अक्षय धन्वे सह आदींनी अभिनंदन करुन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
