परळी तालुक्यातील १४ गावात कंटेनमेंट झोन शिथिल

Beed

परळी तालुक्यातील १४ गावात कंटेनमेंट झोन शिथिल

बीड/प्रतिनिधी 

परळी तालुक्यातील बेलंबा, दैठणाघाट, दाऊतपुरा, इंजेगाव, जिरेवाडी, कासरवाडी, कावळ्याचीवाडी ,कोडगावघोडा, कोठळी, नंदनज, परळी ग्रामीण, पिंपळगावगाढ़े, सारडगाव आणि टाकळी आचार्य येथील कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती.  शासनाचे नियमानुसार येथील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने या १४ गावात प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर  जिल्हादंडाधिकारी मच्छींद्र सुकटे यांनी दिले आहेत.

 परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणू बाधित आढळून आले होते या बँकेशी संपर्कात आलेल्या परळी शहर आणि संलग्न गावात प्रतिबंधक लागू करून संचारबंदी घोषित करण्यात आली होती 

या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे  जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी कळविले आहे. 

यामुळे परळी तालुक्यातील बेलंबा, दैठणाघाट, दाऊतपुरा, इंजेगाव, जिरेवाडी, कासरवाडी, कावळ्याचीवाडी ,कोडगावघोडा, कोठळी, नंदनज, परळी ग्रामीण, पिंपळगावगाढ़े, सारडगाव आणि टाकळी आचार्य या ठिकाणी कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत. 

बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Sharing

Visitor Counter