अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन-ॲड. श्रीनिवास बेदरे

Beed

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन-ॲड. श्रीनिवास बेदरे 

गेवराई/प्रतिनिधी 

राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी केंद्रीय गृहमंत्रालयाने सप्टेंबर महिना अखेरपर्यंत परीक्षा घ्या, असे आदेश केंद्रीय उच्य शिक्षण सचिवांनी दिले आहेत.तसेच युजीसीच्या समितीने परीक्षेच्या मुद्द्यांवरून विद्यार्थी  संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
       

कोरोनाचा धोका वाढला असतानाच परीक्षेचा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे विद्यार्थी  संघटनांचे म्हणणे आहे.या बाबत बीड जिल्हा युवक काँग्रेस तर्फे आज गेवराई तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे परीक्षा रद्द कराव्यात,परीक्षा रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. या वेळी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे,किरण अजबकर,गोटू सावंत,सध्या माटे व इतर पदाधीकारी उपस्थित  होते

Sharing

Visitor Counter