समता बचत गटच्या वतीने महिलांना व्यवसायासाठी संधी

समता बचत गटच्या वतीने महिलांना व्यवसायासाठी संधी
बीड/प्रतिनिधी
दि.23/07/2020 रोजी एकल महिला संघटना बहिरवाडी, बीडच्या लीडर संगिता जाधव यांनी आजच्या परिस्थितीवर मात करत ऋतू काळाप्रमाणे व्यवसायात वाढ करत समता बचत गटाचे कर्ज घेऊन झेरॉक्स मशीन घेतली, व व्यवसायात भर टाकली. कार्यक्रम चे उद्धघाटन एकल महिला संघटना च्या पदाधिकारी च्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या अशा संकटात महिलांना महत्वाचे कामासाठी झेरॉक्स आणायला दूर जावे लागते, व स्वतः त्या बचतगट चे कामे करत आहेत crp आहेत त्यामुळे गर्दी टाळून व इतरांचा पण प्रश्न सुटेल, आणि रोजगाराच्या अडचणी दूर होतील या साठी हा व्यवसाय सुरू केला आहे असं संगिताताई सांगतात. त्या स्वतः एकल आहेत. पण न डगमगता त्या याही परिस्थितीत महिलांना धीर देत आहेत. कोरोनाच्या विषयी जनजागृती करत आहेत. यावेळी एकल महिला संघटना च्या आयोध्यानगर च्या पदाधिकारी शोभा वाघराळ, छाया गवळी, मीरा येलापुरे, संगिता मुळे, सय्यद, मीना मुळे, संगिता बामणे, द्वारका पवार,रुक्मिणी नागापूरे उपस्थित होत्या.
