खा.प्रितमताई यांच्या कार्याला यश
खा.प्रितमताई यांच्या कार्याला यश
गेवराई/प्रतिनिधी
कोरोनो नावांच्या विषाणूने थैमान घातले असुन जगात व देशात आज कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे अनेक ठिकाणी रूग्णांना बेड सुध्दा उपलब्ध होत नाहीत अशा परिस्थितीत बीडच्या खा.प्रितमताई मुंडे यांनी विशेष प्रयत्न करून केंद्र सरकारच्या पि.एम.केर फंडातुन गेवराई उपजिल्हा रुग्णालयासाठी 10 व्हॅन्टीलिटर उपलब्ध झाले आहेत तरी त्यांचा रूग्णांना फायदा होईल आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की आज महाराष्ट्रात रूग्णांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळे अनेक गावांच्या रूग्णालयात रूग्णांना बेड सुध्दा उपलब्ध होत नाही तर व्हॅन्टेलिटर न मिळाल्याने अनेक रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत पण आपल्या खा.प्रितमताई मुंडे याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्याकडे पाठपुरावा करून पि.एम.फंडातील निधी मधुन गेवराई उपजिल्हा रुग्णालयाला दहा व्हॅन्टेलिटर मिळाले असून लवकरच ते रूग्णांच्या सेवेसाठी उपयोगी पडेल असे आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे
यावेळी बोलताना ते म्हणाले की सध्या सर्वञ करोनोचे नांवाच्या रोगाने थैमान घातले आहे तसेच बीड जिल्ह्यात सुध्दा रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे विशेषत गेवराई तालुक्यात तर दररोज रूग्णांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा सध्या गल्लो फिरून नागरिकांची तपासणी करू लागले आहेत पण काही ठिकाणी आरोग्य आधिका-यांना तपासणी करण्यासाठी विरोध करत आहेत असे आरोग्य आधिका-या कडून सागण्यात येत आहे तरी आरोग्य आधिकारी आपल्या परिने प्रयत्न करत आहेत पण नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे असे आवहान आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी नागरीकांना केले आहे