बीड जिल्ह्यातील शेतक-यांना वाजवी दरात युरिया खत उपलब्ध करुन द्या -ॲड.श्रीनिवास बेदरे

Beed

बीड जिल्ह्यातील शेतक-यांना वाजवी दरात युरिया खत उपलब्ध करुन द्या -ॲड.श्रीनिवास बेदरे

बीड/प्रतिनिधी 

बीड जिह्यातील शेतक-यांना युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध होत नसलेबाबत निदर्शनास येत आहे. शेतकरी हवालदिल झालेले आहेत. तालुकास्तरावर युरिया उपलब्ध नसल्याबाबत शेतक-यांच्या प्रामुख्याने तक्रारी आहेत. खतविक्रेते युरियाची साठेबाजी करुन जादा दराने विक्री करीत असल्याबाबत ग्राम पातळीवरुन तक्रारी आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टया भरडला जात आहे. एकीकडे शेतमालास भाव नाही तर दुसरी कडे युरिया मिळत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे .
शेतक-यांना युरिया उपलब्ध करुन देणेबाबतचे निवेदन बीड जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे यांनी ई -मेलद्वारे    मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना पाठवन्यात आले आहे.
येत्या आठ दिवसांत शेतक-यांना वेळेत व वाजवी दरात युरिया उपलब्ध न झाल्यास बीड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने बीड जिल्हयात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे ॲड.श्रीनिवास बेदरे जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस बीड  यांनी सांगितले.

Sharing

Visitor Counter