संघर्ष मजुर क्रांती संघटनेच्या विधी सल्लागार पदी ऍड शेख फिरोज खालेद यांची निवड

Beed

संघर्ष मजुर क्रांती संघटनेच्या विधी सल्लागार पदी ऍड शेख फिरोज खालेद यांची निवड

बीड/प्रतिनिधी 

संघर्ष मजुर क्रांती संघटना ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मजुरांसाठी सामाजीक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करत आहे.मजुरांच्या अडीअडचणी वर मात करण्याचा प्रयत्न करत आहे.मजुरांच्या न्याय हक्कासाठी सरकारच्या, प्रशासनाच्या विरोधात खंबीर पणे लढा देत आहे.या सोबत संघर्ष मजूर क्रांती संघटनेचे संघटन करणे सुरू आहे .यासाठी बीड चे वकिली क्षेत्रात यशस्वी ठसा उमटवलेले सुप्रसिद्ध वकील सामाजिक क्षेत्रात काम करणारे संघटनेच्या वेगवेगळ्या आंदोलना मध्ये संघटनेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणारे ऍड शेख फिरोज खालेद यांची संघर्ष मजूरक्रांती संघटनेच्या विधी सल्लागार पदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख सादेख यांनी निवड केली असून,ऍड शेख फिरोज यांच्या निवडीने त्यांच्या मित्र मंडळी कडून शुभेच्छानचं वर्षाव होत आहे

Sharing

Visitor Counter