अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त लहुजी शक्ती सेना तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त लहुजी शक्ती सेना तर्फे रक्तदान शिबीर संपन्न
बीड प्रतिनिधी
आज दिनांक ३१ जुलै रोजी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त लहुजी शक्ती सेना कडून रक्तदान शिबिर घेण्यात आला व त्या ठिकाणी १०० लोकांनी रक्तदान करून आपला कर्तव्य पार पाडला रक्तदान करण्यासाठी काही महिला पदाधिकारी देखील रक्तदान करण्यासाठी उपस्थित होते.
आज या कोरोना सारख्या थैमान घातलेल्या रोगाने सगळ्या लोकांचे जीव धोक्यात घातले आहे या महाभयंकर रोगाला लक्षात घेता लहुजी शक्ती सेना ने रक्तदान शिबिर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजन करून रक्तदान शिबिर संपन्न केला आहे. यावेळी उपस्थित लहुजी शक्ती सेना बीड जिल्हा अध्यक्ष जीवन भाऊ सुतार, लहुजी शक्ती सेना महिला बीड जिल्हा अध्यक्षा शीतलताई जाधव, वडवणी तालुक्याचे रणरागिनी प्रमिलाताई माळी शिवसेना जिल्हा संघटक आदींची उपस्थिती होती.
