पोलीस कर्मचाऱ्याकडून कायद्याचे उल्लंघन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

पोलीस कर्मचाऱ्याकडून कायद्याचे उल्लंघन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील रात्रीच्या वेळी सुरू असलेले हॉटेल बंद करण्यास सांगितले होते त्यानंतर हॉटेलमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली . या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे . पोलीस कर्मचाऱ्याचे नाव संदीप गिराम आहे .
पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असल्याची माहिती आहे . रविवारी रात्री 12 च्या सुमारास शहरातील जालना रोडवरील एक हॉटेल सुरू होती . याची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या पोउपनि . मिना तुपे त्याठिकाणी पोहचल्या त्यांनी हाॅटेल 1 वाजला आहे हॉटेल बंद करण्यास सांगितले परंतु त्याठिकाणी एक पोलिस कर्मचारी हॉटेलात बसलेला होता व तो म्हणाला कि ' काय करायचं ते करा ' हॉटेल बंद करत नाही , मला काय शिक्षा होयची ती होऊ दे अस म्हणत हुज्जत घातली याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
