जिल्ह्यातील ४ ठिकाणी कंटेनमेंट झोन शिथिल

जिल्ह्यातील ४ ठिकाणी कंटेनमेंट झोन शिथिल
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील 2, परळी शहरात १, अंबाजोगाई शहरातील १ असे एकूण ४ ठिकाणी प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविण धरमकर यांनी दिले आहेत.
या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी कळविले आहे.
बीड शहरातील लक्ष्मण नगर (लेंडी रोड) व कागदी दरवाजा या २ ठिकाणी, परळी शहरातील पेठ मोहल्ला , अंबाजोगाई शहर मधील आदर्श कॉलनी असे जिल्ह्यात एकूण ४ संबंधित परिसरातील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात आले आहे व या संबंधित परिसरातील परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.
बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ आॅगस्ट २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
