धारूर शहरात मोकाट जनावराचा सुळसूळाट नागरीक ञस्त

Dharur

धारूर शहरात मोकाट जनावराचा सुळसूळाट नागरीक ञस्त

किल्लेधारुर/प्रतिनिधी
        
धारूर शहरात मोकाट जनवराचा मुख्यरस्त्या वर सुळसुळाट झाल्याने नागरीक व वाहन धारक वैतागून गेले असून या जनावराचा बंदोबस्त नगरपरीषदेने करावा आशी मागणी नागरीकातून होत आहे.
       धारूर शहर परिसरात मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांच्या सुरक्षेसह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे शहरातील नागरिक त्रस्त असून या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी किल्ले धारूर वासियाच्या वतीने करण्यात येत  आहे.  मात्र,प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नाही. यांच्याही जीवाचा धोका वाढत आहे मागील काही दिवसाखाली केज रोड कॉलेज समोर दोन गायीचे वासर अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू पावले होते, जनावराचा रस्त्यावर सुळसुळाट झाला असून रस्त्या वर जनावराचे टोळकेचे टोळके वावरताना दिसत आहे.रस्त्याचे चालणारे नागरीकाना भितिमय वातावरण तयार झाले असून दबकून वावरावे लागते तर वाहन धारकान वाहन चालवताना सावध रितीने चालवावी लागतात या मोकाट जनावरा मुळे नागरीक माञ वैतागून गेले आहेत या जनावराचा तात्काळ बंदोबस्त करावा आशी मागणी नागरीका मधून होत आहे.

Sharing