महाराष्ट्राचे कवी प्रेम पवळ यांना युथ आयकॉन फाउंडेशनचा कोविड योद्धा म्हणून पुरस्कार प्रदान

Beed

महाराष्ट्राचे कवी प्रेम पवळ यांना युथ आयकॉन फाउंडेशनचा कोविड योद्धा म्हणून पुरस्कार प्रदान

आष्टी/प्रतिनिधी 

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा या छोट्या गावातील  महाराष्ट्राला आपल्या प्रतिभावंत लेखणीतून कवितेच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारे व अनेक महाराष्ट्रभर पुरस्काराने सन्मानित असणारे .
माननीय श्री महाराष्ट्राचे भूषण कवी प्रेम पवळ यांना नॅशनल इंटरनॅशनल स्तरावर सामाजिक शैक्षणिक स्पोर्ट आशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या युथ आयकॉन फाउंडेशनचा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला या आधीही कवी प्रेम पवळ यांना विदर्भ याचबरोबर महाराष्ट्रातील विविध मानाच्या पुरस्काराने साहित्यक्षेत्रात त्यांना सन्मानाने गौरवण्यात आले आहे .
यादी कवी प्रेम पवळ यांचे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत
वेदनेच्या पाउलखुणा त्यांचा कवितासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे या कवितासंग्रहाला तानी या चित्रपटातील सहकलाकार विशाखा गणोरकर(नागपूर) कलाकाराची भूमिका निभावणाऱ्या  नाई के ची प्रस्तावना आहे .कवी प्रेम  पवळ यांनी  कोरोना च्या चालु असलेल्या संकट मय काळात आपल्या प्रतिभावंत विचारातुन आपल्या लेखणीच्या माध्यमातुन कवितेच्या व चारोळी च्या माध्यमातुन समाज्याने आपले स्वःताची व समाजाची कशी काळजी घ्यावी या बद्दल विचार मांडले . यांच बरोबर कोरोना काळात आपल्या जिवाची बाजी लावून समाज्यासाठी रात्र दिवस झटणारे डॉ ' पोलिस नर्स अगणवाडी सेवीका अशा वर्कर या सर्वाना समाज्यानी सहकार्य करावे . हे हि त्यानी आपल्या लेखनीतुन कवितेच्या माध्यमातुन समाज्यापर्यत पोहचवीले . सर्व महाराष्ट्राने दखल घ्यावी असा आगळावेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम ही त्यांनी राबविलात्यांच्या प्रतिभावंत विचारसरणीतून निर्माण होणाऱ्या कविता  व त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन युथ आयकॉन फाउंडेशन या संस्थेने त्यांना करोना युद्धा हा पुरस्कार जाहीर केला या पुरस्कारा मुळे सुलेमान देवळा व पंचक्रोशीतील गावातून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे .

Sharing

Visitor Counter