माळेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या,समाजकंटकांना त्वरीत अटक करा -राजु पैठणे

माळेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या,समाजकंटकांना त्वरीत अटक करा -राजु पैठणे
बीड/प्रतिनिधि
दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना तर्फे बीड जिल्हा अध्यक्ष राजु पैठणे यांनी केला तिव्र निषेध!सनातनी देशद्रोही समाजकंटक दिवसेंदिवस विश्वरत्न,संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना करताना दिसुन येतात.सरकार व गृहमंत्रालयाच्या दुर्लक्षामुळे अशा विकृत घटना घडत आहे.नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा गावात भारताच्या राज्यघटनेचे निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही देशद्रोही सनातनी समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली.षंढ विकृतीचा माज चढलेल्या आरोपी समाजकंटकांवर सरकार व गृह विभागाच्या पोलीसांनी उच्चस्तरीय चौकशीनिशी त्वरीत अटक करावी.अशी मागणी दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष राजु पैठणे यांनी या घटनेचा तिव्र निषेध नोंदवुन केला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा एक हात तोडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेच्या गंभीर घटनेमुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. वातावरन संतप्त आहे.सरकारच्या गृह मंत्रालय व नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षकांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर उच्चस्तरीय गुन्हे दाखल करुन त्यांना त्वरीत अटक करावी.अन्यथा संपुर्ण आंबेडकरी जनता कोरोना लॉकडाऊन मध्ये सुध्दा लोकशाही मार्गाने सरकार विरोधात तिव्र आंदोलन पेटविल्या शिवाय राहनार नाही.सोबतच बीड मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ कैमेरा त्वरीत लावण्यात यावा,व 24 तास संरक्षण देण्यात यावे.बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर नगर पालिका व पोलिस प्रशासन तेव्हाच पुतळ्याला संरक्षण देणार आहात का? असेही पैठणे म्हणाले.
नांदेड जिल्ह्यातील माळेगांवात डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना ज्या समाजकंटकांनी केली त्यांना त्वरीत अटक करावी व कोणत्याही ठिकाणच्या बाबासाहेबांच्या व कोणत्याही महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होणार नाही यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस यंत्रना सज्ज करावी.या संदरर्भात दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना बीड जिल्हा अध्यक्ष राजु पैठणे यांनी प्रसिद्धि पत्रकाच्या माध्यमातून माहीती दिली आहे.
