आज बीड शहरातील अंटीजन टेस्ट मध्ये 137 कोरोना पाॅजीटीव

आज बीड शहरातील अंटीजन टेस्ट मध्ये 137 कोरोना पाॅजीटीव
बीड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मा.जिल्हाधिकारी , बीड यांच्या आदेशानुसार बीड शहरातील सर्व व्यवसायीक व कामगार वर्ग यांची अॅन्टीजन तपासणी करण्याकरीता नियोजन करण्यात आलेले होते . सदर तपासणीकरता सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती . त्यामध्ये १.बलभिम महाविद्यालय , बीड २.माँ वैष्णवीदेवी पॅलेस , एम.आय.डी.सी.रोड , बीड ३.जिल्हा परिषद शाळा , अशोक नगर , बीड . ४.राजस्थानी विद्यालय , विप्रनगर , बीड ५.चंपावती प्राथमिक शाळा , बुथ क्र .१ नगर रोड , बीड ६.चंपावती प्राथमिक शाळा , बुथ क्र .२ नगर रोड , बीड या ठिकाणांचा समावेश होता . सदर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी , शिक्षक , प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी , आरोग्य सेवक , डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण ९ ४ कर्मचाऱ्यांनी काम पाहिले . बीड शहरातील ६ तपासणी केंद्रावर ३१७० व्यावसायिकांची कोविड -१ ९ निदानासाठी Antigen Test तपासणी करण्यात आली . सदर तपासणीमध्ये १३७ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले . लागण झालेल्या १३७ नागरिकांना उपचाराकरीता हलविण्यात आले . सदर लोकांची तपासणी व निदान झाल्यामूळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबविण्यास मदत होणार आहे .