शासकीय ग्रामीण रूग्णालय आष्टी येथे कोवीड-19 संदर्भात आढावा बैठक संपन्न

Ashti

शासकीय ग्रामीण रूग्णालय आष्टी येथे कोवीड-19 संदर्भात आढावा बैठक संपन्न

आष्टी/प्रतिनिधी

आष्टी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्या संदर्भात ग्रामीण रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार चालू असताना कुठल्याही परिस्थितीत दिरंगाई होऊन रुग्णांच्या तक्रारी येऊ नाहीत यासाठी कार्यतत्पर आ. बाळासाहेब आजबे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  
दानशूर, न्यायी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचा प्रतिमेला अभिवादन करून आढावा बैठकीची सुरवात करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण हे ग्रामीण भागातील शेतकरी, गोरगरीब असतात त्यांना योग्य उपचार मिळावेत तसेच रुग्णांच्या तक्रारी येऊ नाहीत यासाठी त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत असे आ. आजबे म्हणाले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात माजी आमदार दरेकर नाना,डॉ शिवाजी राऊत, अण्णासाहेब चौधरी, तहसीलदार महेंद्रकर साहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष कुठूळे काकासाहेब शिंदे पत्रकार  शरद तळेकर सरपंच अशोक पोकळे, रोहित निंबाळकर, सर्व डॉ,परिचारिका आदी उपस्थित होते

Sharing

Visitor Counter