कासारी - मुर्शदपुरचे सरपंचाच्या मनमानी कारभाराने ग्रा. सदस्यांना असंतोष. अविश्वास ठराव मंजूर प्रक्रिया चालू असताना सरपंचांनी दिला राजीनामा.

Ashti

कासारी - मुर्शदपुरचे सरपंचाच्या मनमानी कारभाराने ग्रा. सदस्यांना असंतोष.  अविश्वास ठराव मंजूर प्रक्रिया चालू असताना सरपंचांनी दिला राजीनामा

सरपंच संतोष चव्हाण यांचा राजीनामा मंजूर

आष्टी/प्रतिनिधी.

आष्टी शहरालगतची तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणाऱ्या मुर्शदपुर-कासारी -शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंच संतोष साहेबराव चव्हाण यांच्या विरोधात बुधवार दि.१२ ऑगस्ट रोजी १५-० असा अविश्वास ठराव तहसीलदार वैभव महिंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली मुर्शदपुर ग्रामपंचायत येथे करण्यात आला.
प्रशासकीय अधिकारी पवार, तलाठी ज्ञानेश्वर अनारसे, ग्रामसेवक बाळासाहेब थोरवे हे या ठराव मंजूर सभेस उपस्थित होते. कासारी-मुर्शदपुर-शिंदेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच संतोष साहेबराव चव्हाण यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी दि.५ऑगस्ट रोजी १४ ग्रामपंचायत सदस्यांनी स्वाक्षरी करून अविश्वास प्रस्ताव तहसीलदार कार्यालयात दाखल केला होता.
मुंबई ग्रामपंचायत नियम क्र. ३४४ अन्वये  नोटीसीमध्ये म्हटले आहे की, सरपंच संतोष चव्हाण हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत मनमानी पद्धतीने कारभार करतात आणि तसेच सार्वजनिक विकासात हलगर्जीपणा करत या कारणास्तव ग्रामपंचायत सदस्य अधिका मधुकर लोखंडे, शिवाजी सोनाजी धोंडे, विजय श्रीरंग धनवडे,दादासाहेब आत्माराम बन उपसरपंच सागर गहिनीनाथ धोंडे, अतुल बद्रीनाथ कोठुळे, गीतांजली राजू गीते, मुकेश अंबादास धोंडे, सचिन शिवाजी काकडे, सीता संतोष रणशिंग, भारती त्रिंबक धनवडे,पारूबाई विश्वनाथ सुरवसे,सपना कपील अग्रवाल, अर्चना राजेंद्र बन,मीराबाई भैरवनाथ चव्हाण हे ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.

 

याच दरम्यान सरपंचाचा राजीनामा

ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठराव मंजुर प्रक्रिया चालू असतानाच पंचायत समिती येथे जाऊन सरपंच संतोष चव्हाण यांनी  गटविकास अधिकारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.तर सभापती यांनी तात्काळ राजीनामा मंजूर केला

Sharing

Visitor Counter