फेरफार नकले साठी तहसील कार्यालयात अडवणूक शेतकरी चकरा मारून बेजार पिक कर्जास त्यामुळे विलंब

फेरफार नकले साठी तहसील कार्यालयात अडवणूक शेतकरी चकरा मारून बेजार पिक कर्जास त्यामुळे विलंब
धारूर/प्रतिनिधी
शेतकऱ्यांन पिक कर्जा साठी फेरफार नकलेची मागणी बँकेतून होत आसल्याने तहसील कार्यालयात हि नक्कल मागण्यास गेले तर त्यांची सतत होणारी अडवणूकी मुळे शेतकरी चकरा मारून बेजार आहेत यामुळे पिक कर्जाचे प्रकरणार विलंब होत त्यामुळे अडवणूक थांबवावी आशी मागणी शेतकऱ्यांन मधून होत आहे.
तालूक्यात सध्या शेतकऱ्यांन बँक कडून पिक कर्जा देण्यात येत आहे.पिक कर्ज घेतान फेरफार ची नक्कल आवश्यक आहे तहसील कार्यालयातून फेरफारची नक्कल काढण्या साठी गेले तर चकरा मारण्याची पाळी येते. उडवा उडवीची उत्तरे ऐकावी लागतात अंजनडोह येथील शेतकऱ्यांस तर दस्तावेज जुने झाल्या मुळे फेरफार नक्कल देता येणार नाही असे लेखीच देण्यात आले तहसील कार्यालयातील आशा मनमानी कारभारा मुळे शेतकरी वैतागून गेले आहेत यामुळे पिक कर्जा पासून वंचित राहण्याची पाळी येत आहे तात्काळ या परीस्थीतीत सुधारणा करावी व शेतकऱ्यांचे कामा मधील खोंळबा दुर करावा आशी मागणी योगेश सोंळके, बंडू सोंळके यांनी तहसीलदार कडे निवेदना द्वारे केली आहे
