धारुर नगर पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

धारुर नगर पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी/रवी गायसमुद्रे
शहरात चोहिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.शहरात विविध भागात नाल्या जागोजागी तुंबलेल्या असुन त्याचे घाण पाणी रस्त्यावर येऊन त्याला तलावाचे स्वरुप आले असुन परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.
शहरातील उदयनगर, मच्छि मार्केट जवळ पादचाऱ्यांसह रहिवाश्यांना गेल्या पाच ते सहा महिन्या पासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सध्या सतत पाऊस सुरू असून दिवसभर रिम झिम ढगाळ वातावरण सतच्या पाऊसधारांमुळे शहरात आजारांचा विळखा वाढत आहे. त्यामुळे टायफाईड मलेरिया,डेंग्यू अशा आजार पासून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
नगर पालिकेच्या दुर्लक्षामूळे नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर आले असल्याने स्वच्छता चे तीन तेरा वाजले असून यामुळे धारुर वाशीयांच्या आरोग्याचे काही घेणे देने नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.नगर पालिकेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
