डॉ रामदास मोराळे यांची ग्रामीण रुग्णालय अधिक्षक पदी वर्णी

Ashti

डॉ रामदास मोराळे यांची ग्रामीण रुग्णालय अधिक्षक पदी वर्णी

आष्टी।प्रतिनिधी 
बीड प्रसार न्युज

बीड अहमदनगर जिल्ह्यातील सरहद्दीवर असणाऱ्या आष्टी ग्रामीण रुग्णालयाच्या गेल्या अनेक दिवसापासून वैद्यकीय अधिक्षकाचा कार्यभार व कामकाजानिमित्त येणा-या तक्रारीमुळे जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ.अशोक थोरात यांनी आज आष्टी ग्रामीण रुग्णालयाचा पदभार डाॅ.रामदास मोराळे यांना दिला असून, काल दि.२० रोजी डाॅ.मोराळे यांनी पदभार स्वीकारला आहे.
           

आष्टी ग्रामीण रुग्णालय सतत काही ना काही चर्चेत असते, सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असून, सध्या प्रभारी म्हणून कार्यरत असलेले डाॅ.गुट्टे यांच्या सतत तक्रारी येत असल्याने आज जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ.अशोक थोरात यांनी वैद्यकीय अधिकारी डाॅ.रामदास मोराळे यांच्याकडे अधिक्षक पदाचा पदभार दिला असून,काल गुरूवारी सकाळी डाॅ.मोराळे यांनी पदभार स्वीकारून आपण कायम रुग्णांच्या सेवेत तर आहोतच पण या रुग्णालयात जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डाॅ.मोराळे यांनी सांगितले.

Sharing

Visitor Counter