मागेल त्याला वृक्ष...संकल्प १ हजार वृक्ष वाटपाचा-ॲड.श्रीनिवास बेदरे

Georai

मागेल त्याला वृक्ष...संकल्प १ हजार वृक्ष वाटपाचा-ॲड.श्रीनिवास बेदरे

गेवराई( वार्ताहर )-

झाडांचे महत्त्व सर्वजण जाणतात, झाडांचे आणि सजीव जीवनाचे अतूट नाते आहे. तरीही मानव काही बाबतीत विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करत आहे. त्याचे परिणाम, तोटे आणि त्यावर उपाय म्हणून झाडे लावणे अपेक्षित आहे. हा विचार आपण आपल्या मनावर बिंबवला तर भविष्यात आपण निसर्ग समृद्ध करून प्रदूषण कमी करू शकू. 
परंतु या "अतिजाणकार" केंद्र सरकारने घेतलेल्या पर्यावरण विरोधी भूमिकेमुळे भविष्यात निसर्गाची खूप मोठी हानी होऊ शकते. मा.केंद्रिय पर्यावरण मंत्री यांना "Environmental Impact Assessment मधील पर्यावरणविरोधी सुधारणा रद्द करा" या मागणीसाठी बीड जिल्हा युवक काँग्रेस हा उपक्रम राबवणार आहे.   
अनेक संत, महात्मे, समाज सुधारक झाडांचे महत्त्व सांगून गेले. झाड आणि कुठलेच जीवन वेगवेगळे नाही. झाडांचे जे कार्य चालते ते सजीवसृष्टीला सांभाळून आहे. झाडांची निर्मिती आणि निसर्गचक्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. झाडे आणि हालचाल करणारे सजीव हे एकमेकांना श्र्वासाची आदानप्रदान करतात असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. माणूस जो श्वास घेतो तो झाडांपासून प्राप्त होतो. निसर्गचक्रात शुद्ध हवेची कमतरता झाडे भरून काढतात.
झाडे ज्या प्रदेशात जास्त आहेत त्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो याचा अर्थ म्हणजे झाडांसाठी पाण्याची आवश्यकता असते. आणि झाडांमुळे त्या प्रदेशात पाऊसाचे वातावरण सतत निर्मिले जाते. म्हणून दुष्काळी भाग जर आपल्याला समृद्ध करायचा असेल तर झाडे लावणे खूप आवश्यक आहे. 
झाडांचे महत्त्व जर समजले असेल तर झाडांची होणारी तोड आणि नवीन वृक्ष लागवड यासंदर्भात नक्कीच आपण पाऊल उचलले पाहिजे. आपण आज महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात दुष्काळ आला असे ओरडतो किंवा पाऊस जास्त पडला असे ओरडतो, परंतु निसर्गाची अवकृपा का होत आहे याचे कारण जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे .  
निसर्ग व्यवस्थित काम करतच असतो. परंतु मानवी दुष्कृत्यामुळे निसर्गचक्रात अडथळा निर्माण होतो.
आपण या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यासाठी आपला हा उपक्रम  खूप सार्थकी ठरू शकतो. वृक्षसंवर्धन करण्यासाठी केंद्र सरकार पाऊले उचलताना दिसत नाहीये परंतु आपण सर्वानी या अभियानामार्फत आज माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी जी यांच्या जयंती निमित्त  २० ऑगस्ट पासून  झाडे लावण्याचा निश्चय करू आणि केंद्र सरकारला Environmental Impact Assessment मधील पर्यावरणविरोधी सुधारणा रद्द करायला भाग पाडू.याची सुरुवात आज जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याधापक काझी सर,पोपळघट सर यांना वृक्ष भेट देऊन या कार्याची सुरुवात करताना बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे,गेवराई तालुका अध्यक्ष किरण अजबकर,गोटू सावंत,संभाजी अजबकर आदी  उपस्थित होते.

Sharing