गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरीकांची गर्दी!

Beed

गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरीकांची गर्दी

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील नगर नाका रोडवर गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे तरी सुद्धा नागरीकांनी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी  मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.आपण कोरोना संकट आपल्या घरी न घेवून जाता गणेशजी ला घरी घेऊन जातो हे लक्षात ठेवून सोशलडिस्टन चा वापर करून गणेश मूर्तीची खरेदी करावी तसेच मास्क व सॅनिटायजर वापर ज्यास्तीत ज्यास्त करावं.

आरोग्य आणि समाज प्रबोधनावर भर द्या

सण आणि उत्सवांची बदलेली रूपे आपण पाहिली आहेत, यातील काळानुरूप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, कोरोनामुळे जिथे सगळे जग हादरून गेले आहे तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू असे सर्वांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे.

Sharing

Visitor Counter