वीज बिल माफी साठी AIMIM बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी व अधिक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले

Beed

वीज बिल माफी साठी AIMIM बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी व अधिक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले

बीड/प्रतिनिधी 

संपूर्ण देशात मागील 5 महिन्या पासून कोरोना आणि लॉकडाऊन मुळे प्रत्येक जण आर्थिक अडचणीत सापडला आहे त्या अनुशंगाने राज्य सरकारने सरसकट वीज बिल माफ करावी अशी मागणी AIMIM बीड जिल्ह्याच्या वतीने 19 जुलै 2020 रोजी बीड जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत साहेब यांना करण्यात आली होती व 20 जुलै 2020 राजी 5 मिनीट साठी लाईट बंद करो आंदोलन बीड जिल्हा सह महाराष्ट्र मध्ये करण्यात आले होते त्या आंदोलनाला सर्व सामान्य जनतेने मोठा प्रतिसाद दिला व AIMIM च्या मागणीची दाखल घेऊन राज्य सरकारने काही प्रमाणात सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्याचा काम राज्य सरकार करत आहे परंतु ती मदत सर्व सामान्य जनते साठी पुरेशी नाही आहे AIMIM बीड जिल्ह्याची व AIMIM महाराष्ट्रची  अशी मागणी आहे 
1) 100 युनिटपर्यंत ज्यांचा वापर आहे अशा घरगुती व शेती च्या ग्राहकांना संपूर्ण बील माफ करावे 
2) ज्या ग्राहकांनाचा वापर 300 युनिटपर्यंत आहे अशा सर्व ग्राहकांना 50% बील माफ करण्यात यावे 
3) ज्या ग्राहकांनाचा वापर 500 युनिट पेक्षा जास्त आहे त्या ग्राहकांचे 30% बील माफ करावे अशी मागणी AIMIM च्या वतीने करण्यात आली आहे 
जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास AIMIM चे अध्यक्ष खा. बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा.इम्तियाज जलील साहेब व कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी व मराठवाडा प्रमुख फेरोज लाला साहेब यांच्या आदेशानुसार 1 सप्टेंबर 2020 नंतर लोकशाही मार्गाने आम्ही पुढील आंदोलन करू असा इशारा AIMIM बीड जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला 
वरील मागणीचे निवेदन AIMIM बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी बीड व अधीक्षक अभियंता महाराष्ट्र महावितरण कार्यलय बीड येथे देण्यात आला यावेळी AIMIM बीड जिल्हाध्यक्ष अॅड शेख शफीक भाऊ,नगरसेवक.शेख मातीन,मोमीन अझहर, जिल्हासचिव.अय्युब पठाण,शेख एजाज (खन्ना भैय्या),हॅरीसन रेड्डी, नईम मेम्बर, सय्यद आमेर, फेरोज मणियार, सय्यद सैफअली (लालू भैय्या) आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter