गुट्टे साहेब हजर राहा नस्ता,आम्ही हजर करू - मनसे प्रदेश अध्यक्ष अशोक तावरे

Beed

हजर राहा नस्ता,आम्ही हजर करू - मनसे प्रदेश अध्यक्ष अशोक तावरे 

वारंवार तक्रार असुन देखील जिल्हा अधिकारीचे दुर्लक्ष का?

बीड/प्रतिनिधी

काल बीड शहरामध्ये नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिका चे मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध निवेदन देण्यात आले निवेदन मध्ये वारंवार मुख्य अधिकारी हजर राहत नाही म्हणून त्यांना हजर राहा नसता आम्ही हजर करू असा इशारा देखील मनसेच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आला.

कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीमध्ये प्रशासन आपली चांगलीच भूमिका पार पाडत आहे परंतु नगरपालिकेचा हलगर्जीपणा या ठिकाणी दिसून येत आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध वारंवार तक्रार असून देखील पण  जिल्हाधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष का करता?असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला अशी लोकांची समस्या लक्षात घेत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

बीड प्रसार सोबत बोलताना म्हणाले,आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना बीड जिल्ह्याच्या वतीने बीड नगर पालीका मुख्याधिकारी कार्यालयास वेळोवेळी निवेदने देण्यासाठी अथवा शहरातील नागरीकांच्या कामाबाबत गेलो असता , बीड नगर पालीकेचे मुख्याधिकारी श्री.गुट्टे हे कार्यालयात अनुपस्थितीत असल्याचे दिसून आले आहे.अशाच प्रकारच्या शहरातील नागरीकांच्या सर्रास तक्रारी आहेत.कोरोना सारख्या महामारीने , देशासह बीड शहर त्रस्त असतांना नगर पालीका प्रशासनाचा मुख्याधिकारी हा कार्यालयास उपस्थित राहत नसल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत . तरी या तक्रार अर्जाद्वारे आम्ही आपणास विनंती करतो की , श्रीमान गुट्टे यांना प्रशासकीय कार्यालयात उपस्थित राहुन काम करता येणे शक्य नसेल तर मा.जिल्हाधिकारी साहेबांनी नगर पालीकेस पुर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा अशी  विनंती देखील मनसेच्या वतीने करण्यात आली आहे..

Sharing

Visitor Counter