आमदार संदीप भैय्या क्षिरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

Beed

आमदार संदीप भैय्या क्षिरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

युवती जिल्हा अध्यक्ष प्रिया डोईफोडे चा स्तुत्य उपक्रम

बीड/प्रतिनिधी

बीड विधानसभा मतदार संघाचे युवा आमदार संदीप क्षिरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 
 राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने गरीब ,गरजू विध्यार्थी  मुलांना बीड जिल्हा युवती अध्यक्ष प्रिया डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करून आमदार संदीप क्षिरसागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

तेलगाव नाका रोड वरील वस्ती वर    हातावर पोट भरणारे ,गरीबलोक वास्तव्य करतात,त्या ठिकाणी ते लोक पाल (झोपडी) बांधून राहतात, त्यांच्या मुलांना शालेय साहित्याची गरज होती ती  गरज आमदार संदीप भैय्या यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्य वाटप करून एक आगळा वेगळा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात आला.
 या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी अनेक विषय आणि समस्यां तेथील नागरिकांनी मांडल्या ,या सर्व समस्या मा. संदीप भैय्या यांच्या समोर ठेवून त्या सोडवून घेण्याचा शब्द या वेळी प्रिया डोईफोडे यांनी तेथील नागरिकांना दिला .तसेच तेथील मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावे यासाठी ही प्रयत्न करण्यात येतील असे सांगून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी "प्रिया डोईफोडे राष्ट्रवादी युवती शहर बीड जिल्हा अध्यक्ष" तसेच राष्ट्रवादी युवती च्या शहरातील  युवती कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Sharing

Visitor Counter