कोविड रूग्णासाठी बीड जिल्ह्यात एक हजार खाटाचा रुग्णालय तयार

Beed

कोविड रूग्णासाठी बीड जिल्ह्यात एक हजार खाटाचा रुग्णालय तयार

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात कोविड 19 या उपचारासाठी 1000 खाटाचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोखंडी सावरागाव या ठिकाणी रुग्णालय तयार करण्यात आला आहे या ठिकाणी वैयक्तिकरित्या उपचार सुरू करण्यात येणार असून याठिकाणी फक्त कोविड उपचारच होणार असल्याची माहिती बीड जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यात जास्तच वाढत असून याठिकाणी रुग्णांना त्रास होवु नये म्हणुन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर प्रयत्न चालू होते आज याठिकाणी  लोखंडी सावरगाव या येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1000 खाटाचा रुग्णालय तयार करण्यात आला असून येत्या सोमवारी त्याला चालू करणार असल्याची माहिती बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली.

Sharing

Visitor Counter