''पिंपळगाव''करांच्या यातना रस्ता उखडल्याने दररोज घडतात लहान मोठे अपघात

''पिंपळगाव''करांच्या यातना रस्ता उखडल्याने दररोज घडतात लहान मोठे अपघात
लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
गंगामसला/शेख अबुजर
भारताची वाटचाल महासत्तेकडे असून पण सद्या कोरोना नावाचं मोठं गतिरोधक या मार्गावर असल्याने गतिरोधकावर प्रसंगावधान राखत वाटचाल सुरू असून
पण यात गावखेड्याची अवस्थेकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे
त्यात बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो यात माजलगाव तालुक्यातील बीड व परभणी जिल्हा सरहद्दी वर असलेलं गाव म्हणजे 'सरवर पिंपळगाव' गाव
या गावाच्या अगदी जवळून गेलेल्या गोदावरी गंगेला वेळोवेळी येणाऱ्या पुरामुळे अनेकवेळा गावाचा संपर्क तुटत असल्यामुळे प्रशासनाकडून गाव पुनर्वसन करण्याबाबत हालचाली करण्यात आल्या होत्या मात्र जागेचा प्रश्न उदभवला म्हणून गावातील एका प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या मालकीची जमीन गावासाठी दान केली होती मात्र
मागील तीस वर्षांपासून पुनर्वसनाच्या लालफितीत अडकलेल्या प्रस्तावावर अजून ही प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या पाहायला मिळत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यात माजलगाव ते पाथरी मार्गावरून गावात जाणाऱ्या रस्त्याची चाळणी झाली असून सद्या पावसाळा असल्याने रस्त्यावरून जा-ये करतांना तारेवरची कसरत करावी लागत असून रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे दुचाकी घसरून छोटे मोठे अपघात होत आहे.
