सामाजीक चळवळ गतिमान करण्याचे काम प्रतिष्ठाण मार्फत करणार- तुळशीराम वाघमारे

Beed

सामाजीक चळवळ गतिमान करण्याचे काम प्रतिष्ठाण मार्फत करणार- तुळशीराम वाघमारे

अंकुश आतकरे,भूषण वक्ते,मोहन वक्ते यांचा प्रतिष्ठाण तर्फे सत्कार

गेवराई/प्रतिनिधी

येत्या काळात सामाजिक चळवळ गतिमान करण्याचे काम संत रविदास प्रतिष्ठाण मार्फत करून सर्व समाज बांधवाना सोबत घेऊन समाजपयोगी काम आणि कार्य करण्यात येणार असून ,गरजू ,वंचित,निराधार यांना आधार देण्याचे काम मागील काळात प्रतिष्ठाण ने केले आहे आणि यापुढे ही हे कार्य कायम सुरू राहील असे  पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठाण चे संस्थापक तुळशीराम वाघमारे यांनी  शासकीय विश्रामगृह, गेवराई या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमात  मनोगत व्यक्त करताना सांगितले.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तालुकाध्यक्ष किशोरजी कांडेकर तसेच मान्यवर उपस्थित होते.

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाच्या गेवराई तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी अंकुश आतकरे यांची निवड तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या तालुका संघटक पदी नियुक्त मोहन वक्ते व जातेगाव सर्कल पदी नियुक्ती भूषण वक्ते यांची नियुक्ती झाल्या बद्दल प्रतिष्ठाण तर्फे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्वांचा यथोचित सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. प्रतिष्ठाण च्या पदाधिकारी यांनी  सामाजिक चळवळीत काम करत असताना मनात नेहमी सामाजिक कार्याचा ध्यास आणि काम करण्याची आवड असणाऱ्या समाज बांधवांना वेळोवेळी प्रोत्साहित करून मानसन्मान दिला आहे.गेवराई या ठिकाणी पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य संस्थापक तुळशीराम वाघमारे,प्रतिष्ठाण चे पदाधिकारी जितेंद्र खरात सामजिक चळवळीतील अग्रेसर असणारे मित्र ज्ञानेश्वर पवार,adv रघुचंद्र मस्के  यांच्या वतीने नवनिर्वाचित नियुक्ती पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विशाल उमप, विजय बदरे, अनिल बदरे,नितीन कांबळे,समाधान खंडागळे, शुभम वक्ते,सुंदर वक्ते,हर्ष पटेकर,मंन्थु निसर्गंध यांच्या सह मित्र परिवार उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter