मुंबई कृषी उत्पन्न बाजार समतीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल युवकांच्या वतीने अशोक आबा डक यांचा सत्कार
Beed

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समतीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल युवकांच्या वतीने अशोक आबा डक यांचा सत्कार
माजलगाव/वार्ताहर
मुंबई येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी अशोक आबा डक यांची निवड झाली असता लऊळ येथील युवकांच्या वतीने आबांचा सत्कार करण्यात आला. आशिया खंडातील मुंबई येथील सर्वात मोठ्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी अशोक आबा डक यांची निवड होणे म्हणजे माजलगाव भाग्यच म्हणाव लागेल.आबांच्या या निवडीची माजलगाव तालुक्यासह खेडेगावातही चर्चा होत असून या निवडीचे कौतुक केले जात आहे. मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा पदभार स्वीकारून आबा माजलगाव आले असता ल ऊळ येथील युवकांनी आबांचा सत्कार केला यावेळी गावचे युवक गजानन भैया शिंदे , सुनील शिंदे, तसेच अजिंक्य भैय्या डक, अतुल देशमुख, शैलेश भैया, तसेच सचिन वाघमारे हे उपस्थित होते.