पैठण नाथसागराचे 16 दरवाजे उघडे

पैठण नाथसागराचे 16 दरवाजे उघडले
पैठण/प्रतिनिधी
रविवारी सायंकाळ नंतर रात्री उशिरा पर्यंत टप्प्या टप्प्यांने जायकवाडी धरणाची एकूण १६ दरवाजे वर उचलून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.सध्या धरणाच्या हायड्रो मधून १५८९ तर सांडवा माध्यमातून ६२८८ या क्युसेक वेगाने नदी पात्रात एकूण ७८७७ क्युसेक क्षमतेने पाणी विसर्ग केला जात आहे. या शिवाय धरणाच्या उजव्या कालव्यातून ६०० तर डाव्या कालव्यातून ५०० क्युसेक क्षमतेने पाणी विसर्ग सुरू आहे. धरणातील क्षमतेनुसार चा पाणीसाठा शिल्लक ठेवून पाण लोट क्षेत्रातून येणारी अतिरिक्त पाणी आवक आशा माध्यमातून विसर्ग करण्यावर यंदाही लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता तथा मुख्य प्रशासक राजेंद्र काळे यांच्या नियंत्रणाखाली संबंधित प्रशासनाने भर दिला असल्याचे पहायला मिळत आहे. सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय, नासाडी होणार नाही याची पूरेपूर दक्षता संबंधित प्रशासनाने चोवीस तास सतर्क राहून नियोजन बद्ध पध्दतीने हाती घेतल्याचेही दिसून येत आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धरणातून सुसाट वेगाने बाहेर पडत नदी पात्रात पूढील प्रवासासाठी झेपावत असलेल्या या पाणी विसर्गाचा आॅन दि स्पाॅट पैठणचे पत्रकार एकनाथ काळे पाटील यांनी टीपलेला हा लक्षवेधी क्षण
