बेरोजगार युवकांना दर वर्षी २ कोटी रोजगारनिर्मिति करा :- अॅड.श्रीनिवास बेदरे

बेरोजगार युवकांना दर वर्षी २ कोटी रोजगारनिर्मिति करा :- अॅड.श्रीनिवास बेदरे
गेवराई/वार्ताहर
खा. रजनीताई पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष श्री सत्यजित दादा तांबे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा अध्यक्ष अॅड श्रीनिवास बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गेवराई शहरात "रोजगार दो" हे आंदोलन करण्यात आले.
सरकार ने युवकांसाठी वर्षाला 2 कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले, पण परिस्थिती वेगळीच आहे.
नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परिणीती म्हणजे करोडो रोजगार नष्ट होण्यात झाली.त्यात वस्तू सेवा कराच्या (GST) चुकीच्या अंमलबजावणीमूळे कुटीर- लघु-मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंदयांचे पार कंबरडे मोडले गेले. याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. सरकारच्या भारतीय सांख्यीकी आयोगाच्या (NSC)
अहवालानुसार देशात 2017-18 या वर्षात बेरोजगारीचा दर 6.1 टक्के असुन ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर 5.3 टक्के होता तर शहरी भागात 7.8 टक्के राहिला. तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक, म्हणजे 13 ते 27 टक्क्यांवर पोहोचला होता.
यानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाऊनमुळे 12 ते 13 करोड लोक बेरोजगार झाले असल्याचे CMIE च्या पाहणीतून समोर आले आहे. तेवढ्याच कुटुंबांचे जगणे रोजगाराविना मुश्किल झाले आहे.पंतप्रधान मोदी यांच्या लहरी व चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून नुकतेच भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून -२३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या 20 लाख करोडच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक,शेतकरी व लघु-मध्यम उद्योगक्षेत्र यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही.
म्हणून बीड जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने "रोजगार दो"आंदोलन करताना जिल्हाध्यक्ष अॅड श्रीनिवास बेदरे,तालुका अध्यक्ष किरण अजबकर,बाळासाहेब हिंगे,जिजा जगताप, शेख खुदुस,निलेश तौर, गणेश जगताप, महेश जगताप,कुटे प्रतीक,बाळासाहेब मोटे, गोटू सावंत,राजू पोपळघट आदि उपस्थित होते.
