शाळा,विद्यालय तथा महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करा-लहुजी शक्ती सेना बीड

शाळा,विद्यालय तथा महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करा-लहुजी शक्ती सेना बीड
बीड/प्रतिनिधी
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मागील पाच महिन्यापेक्षा जास्त काळापासून संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला होता . सध्याला अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली असून , 01 सप्टेंबरपासून
मुभा भारतीय जनतेला सरकारकडून देण्यात आलेली आहे .
शासकीय , खाजगी स्तरावरील अनेक सेवा , उद्योग व्यवसाय सध्याला सुरू आहेत . ( उदा.जसे की , विविध कारखाने , उद्योग बाजार , बससेवा , रेल्वे सेवा , दुकाने , हॉटेल्स , देशी दारु , बिअर शॉपी , बिअर बार तसेच काही निर्बंधासह काही सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मुभा ) ही सर्व गर्दीची ठिकाणे खुले करण्यावर सर्व स्तरावर काही अंशी सुरूवात झालेली आहे .
आज देशामध्ये लोक मंदिरे , चर्च , गिरीजाघर , गुरूद्वारा सुरू करण्यासाठी स्वार्थी आंदोलने करत आहेत . मात्र शाळा , विद्यालये , महाविद्यालये बदंच आहेत . यामुळे देशाचे उद्याचे भविष्य असलेली आपल्या पुढच्या पिढीचे शैक्षणिक नुकसान होत आहे . देश जागतीक महासत्ता , आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असतांना देशाचे उद्याचे भविष्य ( विद्यार्थी ) घरामध्ये डांबून ठेवणे ( शाळा बंद ठेवणे ) योग्य नाही . जरी जे निर्बंध आरोग्याच्या दृष्टीने आपणास योग्य वाटत असले तरी आजच्या चालू अनलॉक प्रक्रियेतून कोरोना च्या होणा - या प्रार्दुभावामुळे सर्वच जनता विद्यार्थासहीत मुक्तपणे संचार करत आहेत .
सुरक्षित अंतर , मास्कचा नियमित वापर , काही आरोग्य विषयक निर्बंध लावून शाळा , कॉलेज , विद्यालय , महाविद्यालयाचे सुरू करावेत . विद्यार्थ्यांचे पर्यायाने राज्याचे , देशाचे शैक्षणिक , आर्थिक नुकसान न करता काही आरोग्य विषयक बाबींची पुर्तता करून शाळा , कॉलेज , विद्यालये , महाविद्यालये हे सुरू करण्यासाठी आपण परवानगी द्यावी अशी विनंती ' लहुजी शक्ती सेना आज बीड जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
