अडत मार्केट ते खासबाग देवी मंदिर पर्यंत रस्ता करण्यात यावा-सय्यद सैफअली , शेख सलमान
Beed

अडत मार्केट ते खासबाग देवी मंदिर पर्यंत रस्ता करण्यात यावा -सय्यद सैफअली , शेख सलमान
बीड / प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षा पासून अडत मार्केट ते खासबाग देवी मंदिर पर्यंतचा रस्ता अवस्था ही खूप बिकट झालेली आहे त्यामुळे तिथे खूप प्रमाणे पाणी व चिखलामुळे लहान मोठे अपघात होत आहे व त्या भागातील रस्ता वर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे व तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे अशा परिस्थितसामाजिक कार्यकर्ते शेख सलमान यांनी त्या भागातील समस्या साठी बीड नगर परिषद चे मुख्याधिकारी साहेबांना व नगराध्यक्ष साहेबांना रस्ता करण्यासाठी निवेदन देण्यात आले तो पर्यंत मुख्याधिकारी साहेबांनी त्या रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी सांगितले व लवकरात लवकर रस्ता करून देऊ असे आश्वासन अॅड शेख शफीक भाऊ युवा मंच चे कार्यकर्ते सलमान शेख व इतरांना देण्यात आले
