सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी रमेश नागापुरे बीड यांना कोविड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव प्रदान

सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी रमेश नागापुरे बीड यांना कोविड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव प्रदान
कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टीव्ह ट्रस्टने दिला पुरस्कार
बीड/वार्ताहर
कोरोना व्हायरस (कोविड-१९) या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात मानवतेच्या दृष्टीने अत्यंत जबाबदारीने महत्त्वाची भूमिका बजावत जो अविरत सेवा केली त्या सेवेला कुठलेही मोल नाही त्या उल्लेखनीय कामगिरी (जनसेवेबद्दल)त्यांच्या या सेवाकार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंन्ट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्टच्या वतीने ऑनलाईन पुरस्कार यामध्यें कोवीड-१९ योद्धा विशेष सन्मानपत्र गौरव पुरस्कार ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे, कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर,नर्स ,पोलीस ,कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, पत्रकार समाज, सेवक साहित्यिक, व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळेच आज आपण सर्वजण सुखरूप आहोत अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे, असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या न्युज शी बोलतांना व्यक्त केले,सामाजिक कार्यकर्त्यां रुक्मिणी रमेश नागापुरे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
