बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए पोद्दार यांचा 14 महिन्यांच्या कार्यकाळातील कामगिरी

Beed

बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए पोद्दार यांचा 14 महिन्यांच्या कार्यकाळातील कामगिरी  

बीड/प्रतिनिधी 

मा.पोलीस अधीक्षक श्री . हर्ष पोद्दार यांनी दि .19 / 07 / 2019 रोजी बीड जिल्हा पोलीस प्रमुखपदी पदग्रहण केले व तात्काळ जिल्ह्यातील भौगोलीक , सामाजिक , राजकीय , आर्थिक परिस्थितीचे व गुन्हेगारी व पोलीसांचे कार्यपध्दतीचे विश्लेषण करून गुन्हेगारीवर नियंत्रण व कठोर शासन आणण्यासाठी प्रयत्न केले . पोलीस अधीक्षक म्हणुन श्री हर्ष पोद्दार यांनी मागील 13 महिन्यांत केलेली कामगिरी गुन्हे नियंत्रण बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे . बीड शहर व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्थापन केलेल्या शक्ती पथकांमुळे बलात्कारासारख्या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली . तसेच अपहरण व अपनयण सारख्या गुन्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत 46 ने घट झाली . दक्ष पेट्रोलिंग व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ( जीओ फेन्सिंग , सीसीटीव्ही कॅमेरे , शासकीय वाहनावर जीपीएस सिस्टीमचा उपयोग ) यामुळे जिल्ह्यातील मालाविरुध्दच्या गुन्ह्यामध्ये लक्षणीय घट झाली ज्यामध्ये दरोडा या सदराखाली घडलेल्या गुन्ह्यामध्ये 4 ने घट झाली . व दरोडा या सदराखाली गुन्हे उघडकीचे प्रमाण 90 % आहे . जबरी चोरी या सदराखाली घडलेल्या गुन्ह्यात 26 ने घट झाली . जबरी चोरी या सदराखाली गुन्हे उघडकीचे प्रमाण 60 % आहे . तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हे उघडकीचे प्रमाणामध्ये लक्षणियरित्या वाढ झाली . तसेच वाहन चोरीमध्ये 20 घट झाली . तसेच गुन्हेगारी कृत्याची तात्काळ दखल घेवुन त्यावर कठोर कारवाई करण्याच्या पध्दतीमुळे फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 33 ने घट झाली . तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्याच्या विरोधात पोलीस ठाणे स्तरावर जास्तीत जास्त कारवाया करण्यात आल्या व स्थानिक गुन्हे शाखा अंतर्गत अवैध धंद्यावर कारवाईसाठी विशेष पथक स्थापन करुन पथकाच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक कारवाया करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे पाळेमुळे खोदुन काढण्याचे काम केले . प्रतिबंधक कारवाया शरिराविरुध्द होणाऱ्या गुन्ह्यांस प्रतिबंध करण्यासाठी जास्तीत जास्त प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या . सर्व शीर्षकाखालील प्रतिबंधक कारवायांची तुलना करता मागील वर्षाच्या तुलनेत 1929 ने जास्त आहेत . ज्यामध्ये कलम 55 ते 57 मपोका अन्वये ( 86 ) , कलम 122 मपोका ( 32 ) , MCOCA ( 1 ) , MPDA ( 4 ) अशा कारवाया करण्यात आल्या आहेत . दोषसिद्धी गुन्हा मा.न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी वारंवार कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका घेवुन मार्गदर्शन व पाठपुरावा केल्यामळे 20 गंभीर
गुन्ह्यांमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त कारावासाच्या व जन्मठेप या सारख्या गंभीर शिक्षा मा.न्यायालयाने दिल्या आहेत . जिल्ह्यातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी केलेली कामे : 1. जिल्ह्यामधील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजव्दारे वाहतुक केसेस करण्याकरीता बीड 60 , परळी -54 व गेवराई -36 असे एकुण 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्दारे वाहतुक केसेस सुरू करण्यात आल्या . 2. जिल्हा पोलीस दलातील वाहतुक कारवाईसाठी पावत्यांचा वापर बंद करून 100 % कारवाया ई - चलन डिवाईस मशीन्सव्दारे सुरू करुन वाहतुक शाखा दंड कारवाई पेपरलेस करण्यात आल्या . 3. बीड जिल्हा पोलीस दलाकरीता 210 नवीन बॅरीकेट खरेदी करून वाटप करण्यात आले आहे . 4. अपघातामध्ये मृत्युचे प्रमाण व जखमींचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करून विद्यार्थांना मार्गदर्शन केले व अपघातांमध्ये मदत करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला . 5. जिल्ह्यामध्ये वाहतुक शाखेतील कर्मचारी यांच्या मार्फतीने एकुण 63944 केसेस करुन 1,63,97,150 / - रु . दंड वसुल करण्यात आला आहे . योग्य ट्रॅफिक पॉईंट लावुन बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केल्यामुळे व वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत केलेल्या जागृतीमुळे मागील वर्षीच्या तुलनेत निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण मागील वर्षापेक्षा 38 ने कमी झाले आहे . कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त : बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणुन हजर झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासंबंधाने 1 ) मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची बीड जिल्ह्यातुन महाजनादेश यात्रेचा महत्वपुर्ण बंदोबस्त 2 ) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार यांचा बीड , गेवराई व अंबाजोगाई येथे विधानसभा प्रचारासंबंधाने बंदोबस्त पार पाडण्यात आला . 3 ) भगवान भक्तीगड सावरगाव येथे केंद्रीय गृहमंत्री मा.अमित शहा यांच्या उपस्थितीत एका लाखापेक्षा जास्त जनसमुदायाचा दसरा मेळावा बंदोबस्त सुरळीत पार पाडण्यात आला . 4 ) भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा महत्वपुर्ण विधानसभा प्रचारसबंधाने अत्यंत महत्वपुर्ण बंदोबस्त कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय अत्यंत नियोजनबद्धरित्या व व्यवसायिकरित्या पार पाडण्यात आला . 5 ) शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दव ठाकरे यांचा गोपिनाथगड व बीड येथील कार्यक्रमाचा संवेदनशील बंदोबस्त पार पाडला . 6 ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा.श्री . मोहन भागवत यांचा अंबाजोगाई येथील कार्यक्रमाचा बंदोबस्त पार पाडला अशा प्रकारचे महत्त्वाचे व अतिमहत्त्वाचे व्यक्तींचे बंदोबस्त नियोजनबद्धरित्या व व्यवसायिक पध्दतिने पार पाडुन वरील कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होवू न देता अत्यंत शिस्तबध्द पार पाडण्यात आले . महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा निवडणुक बंदोबस्त व मतमोजणी बंदोबस्त कौशल्यपूर्णरित्या नियोजन करून नेमण्यात आला व नेमलेल्या बंदोबस्ताकडून व्यावसायिकरित्या बंदोबस्त करवून घेतला ज्यायोगे बीड सारख्या संवेदनशील जिल्ह्यातसुध्दा कोणताही अनुचित प्रकार होवु न देता व एकही दखलपात्र गुन्हा दाखल होवु न देता प्रचारसभा , निवडणूक , मतमोजणी व विजयी मिरवणूक बंदोबस्त शांततेत पार पाडला . तसेच सी.ए.ए. , एन.आर.सी. , कलम 370 वगळल्याचे व मा.सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभुमी संबंधाने दिलेला निकालाच्या विरोधात बीड जिल्ह्यात वेगवेळ्या ठिकाणी झालेल्या निषेध अंदोलनाचेजनक्षोभाचा विचार करुन अत्यंत संवेदनशिल पध्दतिने तसेच कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन सदरील आंदोलने हाताळली व कोणताही मोठा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु दिला नाही व जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवली . बीड जिल्ह्यात हजर झाल्यापासुन आषाढी एकादशी बंदोबस्त , बकरीईद बंदोबस्त , श्रीकृष्ण जयंती ( दहिहंडी ) बंदोबस्त , पोळा , मोहरम ताजियाँ , श्री गणेश चतुर्थी बंदोबस्त , नवरात्र उत्सव बंदोबस्त , कोजागीरी पोर्णिमा बंदोबस्त , धनत्रयोदशी ( दिवाळी ) बंदोबस्त , ईद ये मिलाद बंदोबस्त , कार्तिकी पौर्णिमा ( कपिलधार यात्रा ) बंदोबस्त , 06 डिसेंबर , शोर्यदिन डॉ . बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन , ख्रिसमस ( नाताळ ) , छत्रपती शिवाजी महाराज जयंती शासकीय व तिथीप्रमाणे , महाशिवरात्री , होळी / धुलीवंदन , रंगपंचमी बंदोबस्त , गुढीपाढवा बंदोबस्त असे महत्वपुर्ण धार्मीक सण - उत्सवाचे संवेदनशील बंदोबस्त योग्य पद्धतीने व व्यवसायिकरित्या पार पाडले . विश्वभरात निर्माण झालेल्या कोवीड -19 कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये बीड जिल्हा घटकात त्या संदर्भाने लावलेला बंदोबस्त व केलेल्या उपाययोजना स्वत : पाठपुरावा करुन व वैयक्तिक लक्ष देवून उत्कृष्टपणे राबवून घेतल्याने लॉकडाऊन 04 पर्यंत एक ही कोरोनाबाधीत रुग्ण जिल्ह्यात आढळून आला नाही . ज्या वेळेस मिशन बिगेन - अगेन सुरु झाल्यानंतर रूग्ण आढळून आले , याचे पुर्ण श्रेय मा.पोलीस अधीक्षक श्री.हर्ष पोद्दार सर यांना जाते . पोलीस कल्याणासाठी निर्माण केलेल्या पायाभुत सुविधा : 1 ) पोलीस ठाणे दिंद्रुड येथे भारत पेट्रोलिअम कंपनीचे पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करण्यासाठी पेट्रोलपंप निर्माण करुन सदरील पंपाचे उद्घाटन मा.विशेष पोलीस महानिरीक्षक , औरंगाबाद यांचे हस्ते करण्यात आले . 2 ) पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पोलीस कॅन्टीन सुरू करण्यात येवून त्याचे उद्घाटन मा.पोलीस अधीक्षक श्री . हर्ष पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले . 3 ) बिंदुसरा विश्रामगृहाच्या परिसरातील मोकळया जागेत मा.पोलीस अधीक्षक सा . यांचे हस्ते वृक्षारोपन करुन पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम राबवण्यात आला . 4 ) पोलीस ठाणे शिरुर येथे अधिकारी / कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांकरीता उद्यान तयार करण्यात आले व उद्यानाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री . हर्ष पोद्दार यांचे हस्ते करण्यात आले . 5 ) मियावॉकी फॉरेस्ट - बीड जिल्ह्यामध्ये पोस्टे बीड ग्रामीण हद्दीत वासनवाडी शिवार करपरा नदीलगत , पोस्टे तलवाडा हद्दीत तलवाडा येथे , पोस्टे आष्टी हद्दीत पोलीस कॉलनी आष्टी परिसर , पोस्टे माजलगाव ग्रामीण हद्दीत भाटवडगाव शिवार व पोलीस वसाहत परिसरात , पोस्टे केज हद्दीत जुने पोलीस लाईनचे मागे केज येथे , पोस्टे धारुर येथे पोस्टे इमारतीचे बाजुस , पोस्टे परळी ग्रामीण इमारतीचे उत्तर बाजुस अशा एकुण 8 ठिकाणी बीड पोलीस दलाच्या मालकीच्या प्रत्येकी 5000 चौ.फुटांपेक्षा जास्त क्षेत्रात मियावॉकी तंत्रज्ञानाचे आधारे विविध जातींच्या वृक्षांची लागवड पर्यावरण संवर्धनास हातभार लावला . कोविड संदर्भाने केलेली कामे . बीड पोलीस लॉकडाऊन मदत सेल - बीड जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात सपोनि दर्जाचे अधिकारी व स्टाफ नियुक्त करुन 24x7 तासासाठी अत्यावश्यक आणिबाणीच्या परिस्थितीत पासेस देण्यासाठी बीड पोलीस लॉकडाऊन मदत सेलची स्थापना करुन या सेलद्वारे लॉकडाऊन कालावधीत मेडिकल इमर्जन्सी , जवळच्या नातेवाईकाचा मृत्यु अशा कारणांसाठी तात्काळपासेस उपलब्ध करुन देण्यात आले . नागरिकांच्या सोयीकरिता सोशल मिडीयाचा चांगल्या पद्धतीने वापर करुन व्हॉट्सअॅपद्वारेच त्यांना तात्काळ पासेस देण्यात आले . या सेलच्या वतीने लॉकडाऊन काळात 2309 नागरिकांना मदत पुरविण्यात आली त्याच्या प्रसिद्धीसाठी पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांचे व्हिडीआ सोशल मिडीयावर प्रसारित करण्यात आले ऑनलाईन पासेस , जिवनावश्यक वस्तुसांठी . कोवीड -19 पार्श्वभुमीवर लॉकडाऊन काळाल जिवन आवश्यक वस्तुच्या पुरवठ्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पुरवठादारासाठी www.covid-19.mhpolice.in ही वेबसाईट सुरु करुन प्रत्येक पुरवठादांरासाठी ऑनलाईन पासची सुविधा उपलब्ध करुन दिली . पंडित , मौलवी व इतर धर्मगुरुंशी समन्वय कोविड 19 प्रादुर्भावाचे अनुषंगाने शासनाचे निर्देशानुसार सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती . या कालावधीमध्ये सर्व धर्मिर्यांचे विविध सण - उत्सव शासनाचे नियमांनुसार साजरे करण्यात , व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखुन समाजात धार्मिक सलोखा वृद्धिंगत करण्यात जिल्ह्यातील पंडित , मौलवी व इतर धर्मगुरुंनी पोलीस प्रशासनास सहकार्य केले . पोलीस दलातर्फे 208 पंडित , मौलवी व इतर धर्मगुरुंना प्रमाणपत्र देवुन त्यांना सदिच्छा देण्यात आल्या . » ड्रोन द्वारे पेट्रोलिंग लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याकरिता पोलीस दलातर्फे बीड , परळी , आष्टी , अंबाजोगाई , माजलगाव , केज व गेवराई या 7 प्रमुख शहरांमध्ये ड्रोन कॅमऱ्यांचा वापर करुन पेट्रोलिंग करण्यात आली . जास्त वस्तीच्या भागांत , लहान लहान गल्ली - बोळांमध्ये या ड्रोन पेट्रोलिंगद्वारे लक्ष ठेवण्यात येवुन लॉकडाऊनचे पालन करवुन घेण्यात आले . मजुर , महिलांना अन्नधान्याचे वाटप लॉकडाऊनमुळे रोजगाराची साधने गमावून बसलेल्या मजुरांना व गरीब महिलांना पोलीस प्रशासनातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले . तसेच अन्य शासकीय यंत्रणांनादेखील या कामात पोलीस दलाने सहकार्य करुन गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यात आली . चेकनाका पॉईंटला सीसीटीव्ही बसवले जिल्हा सीमेवरील सर्व 16 चेकनाका पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन तेथे पोउपनि दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आली . सदर सीसीटीव्हीचे थेट प्रक्षेपण पोलीस नियंत्रण कक्षात होत होते जेणेकरुन चेकनाक्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यात आली व चेकनाक्यांवर पैसे घेवुन प्रवेश देण्यासारख्या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला . जिल्ह्यात परतणाऱ्या ऊसतोड मजुरांकरिता स्वतंत्र नियंत्रण कक्ष लॉकडाऊनमध्ये परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड मजुरांना जिल्ह्यात परत येण्यास परवानगी मिळाल्यानंतर त्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी 21 मार्ग निश्चित करुन या मजुरांकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला . दि .18 / 4 / 20 ते दि .28 / 4 / 20 कालावधीत 33,000 उसतोड मजुर जिल्ह्यात परतले .ग्राम सुरक्षा दल ग्रामीण भागामध्ये सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन कठोरपणे करण्याकरिता व अवैध मार्गाने नागरिकांनी जिल्ह्यात प्रवेश करु नये यासाठी ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आले . कॉन्टॅक्ट टेसिंग सेल कोविड 19 चे संशयित रुग्णांचे संपर्कात आलेल्या नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सेल स्थापन करण्यात आला . त्याद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी > जिओ फेन्सिंगद्वारे होम क्वारंटाईन नागरिकांवर लक्ष ठेवण्यात आले . पोलीसांसाठी विलगीकरण कक्ष पोलीस मुख्यालय बीड येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे करीता 53 व जुने पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे 34 अधिकारी व कर्मचारी यांचे करिता कोवीड -19 च्या पार्श्वभुमीवर सुसज्ज अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या विलीगीकरण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांचे हस्ते करण्यात आले . पोलीसांकरिता केलेली कोविड संदर्भाने कामे 1 ) कोविड 19 पोलीस प्रोटेक्शन सेल या सेलची स्थापना करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची दैनंदीन आरोग्यविषयक माहिती घेण्यात आली . तसेच टीबी , शुगर , लठ्ठपणा , इतर गंभीर आजार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना फिल्ड मध्ये कर्तव्य न देता कार्यालयात कर्तव्य देण्यात आले . 2 ) पोलीस कॉलनीमध्ये पोलीस कुटुंबांना फळे , भाजीपाला , घरगुती समानाची घरपोच डिलीवरी करण्यात आली . 3 ) फिरते आरोग्य तपासणी पथक - जिल्ह्यातील पोलीसांची व पोलीस कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यासाठी फिरते आरोग्य तपासणी पथक तयार करण्यात आले . 4 ) पोलीसांकरिता कोविड 19 पासुन बचावासाठी साहित्य - पीपीई किट , फेसशिल्ड , एन 95 मास्क , सॅनिटायझर , हॅन्डग्लोव्हज् हे साहित्य पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आले . 5 ) पोलीस वसाहत , पोलीस स्टेशन , कार्यालय , पोलीस वाहनांची वेळोवेळी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले . अशाप्रकारे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्याचे बाबतीत वैयक्तिक लक्ष दिले . पोलीस जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीने केलेली कामे : पोलीस व जनतेचा संपर्क व समन्वय वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिडनाईट वॉकेथॉन तसेच मॅरेथॉन स्पर्धेत स्वत : भाग घेवुन पोलीस कर्मचाऱ्यांचा व जनतेचा उत्साह वृद्धिंगत केला . पोलीस रेझींग डे निमित्त जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थांचे पोलीस मुख्यालय बीड येथे महिला संरक्षणासाठी कडक कायदे आवश्यक आहेत का सामाजिक जागृती आवश्यक आहे या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . सदरील स्पर्धेत जिल्ह्यातील विविध 280 शाळा महाविद्यालयातुन एकुण 840 स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व 10000 पेक्षा जास्त श्रोते विद्यार्थी उपस्थित होते . त्यापैकी 15 संघातील 30 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते . सदरील स्पर्धेचाउद्देश स्पर्धेच्या माध्यमातुन सामाजिक विषयांबाबत विद्यार्थ्यांची जाणीव , संवेदनशीलता वृध्दिंगत करणे तसेच पोलीस व जनता यांचा संपर्क व संवाद वाढवुन पोलीसांबद्दलची विश्वासार्हता वाढविणे हा होता . स्पर्धेच्या माध्यमातुन 11000 विद्यार्थ्यांपर्यंत बीड जिल्हा पोलीस दल पोहोचले . बीड जिल्हा पोलीस ग्राऊंडवर जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . सदरील स्पर्धेत 150 पोलीस कर्मचारी खेळाडू यांनी भाग घेतला होता . त्यानंतर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यामध्ये औरंगाबाद आयुक्तालय , औरंगाबाद ग्रामीण , जालना , उस्मानाबाद व बीड अशा पाच घटकातील 105 खेळाडूंनी भाग घेतला होता . सदरील स्पर्धांचे उत्कृष्ट पद्धतीने आयोजन करण्यात आले . स्पर्धेतील खेळाडूंपैकी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी परिक्षेत्रातील 27 खेळाडूंची निवड करण्यात आली . तसेच एका खेळाडूला अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धेत दुत्तीय पारितोषिक मिळाले . तसेच पोलीस बॉईज व्हॉलीबॉल क्लबचे एक महिला व तीन पुरूष असे एकुण चार खेळाडूंचे जुनिअर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात सहभाग नोंदवला तसेच 16 वर्षांखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग नोंदवला . इतर कामे > निवडणुकीसाठी शॉर्ट फिल्म राज्य विधानसभा निवडणुक 2019 चे अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना निवडणुकीत निर्भयपणे मतदान करता यावे व नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी श्रीमती आरती बागडी ( दिग्दर्शिका ) यांचे सहकार्याने बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने फ्री , फेअर अॅन्ड फिअरलेस ( Free , fare & fearless ) या लघुपटाची निर्मिती करण्यात आली . या लघुपटास सन 2019 चा ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने देण्यात येणारा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला . श्वान रॉकीस मानवंदना पोलीस दलासाठी कर्तव्य बजावणाऱ्या श्वान रॉकी याच्या दुर्दैवी मृत्युनंतर त्यास सन्मानपुर्वक मानवंदना देवुन त्याने निष्ठेने बजावलेल्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . याची नोंद मा . पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दि .30 / 8 / 2020 रोजीचे आपले मन की बात या कार्यक्रमात घेतली . व्हिडीओ संदेशांद्वारे समाजात वेळोवेळी जागृती जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक , अपर पोलीस अधीक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी , पो.स्टे . प्रभारी अधिकारी यांचेसह पंडित , मौलवी , धर्मगुरु यांचे समाजात शांतता अबाधित राखण्याकरिता व्हिडीओ संदेश बनवुन ते सोशल मिडीयातुन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले . रुट मार्च जिल्ह्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये जिल्हा पोलीस , होमगार्ड , राज्य राखीव पोलीस दल , दंगल नियंत्रण पथक , शीघ्र कृती दल यांनी रुट मार्च केले . यामुळे सर्वसामान्यांमध्ये पोलीसांच्या उपस्थितीची जाणीव होऊन सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत झाली व उपद्रवी घटकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत धाक निर्माण होवुन जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही > सोशल मिडीया मॉनिटरींग सेल 6/7 लॉकडाऊन कालावधील शासनाने घेतलेल्या निर्णयांबाबत , कोरोना आजाराबाबत तसच रुग्णांबाबत सोशल मिडीयातुन अफवा पसरवण्याचा प्रकारात जिल्ह्यासह राज्यात वाढझाली होती . जिल्हा पोलीस प्रशासनाने वेळीच याची दखल घेवुन सोशल मिडीया मॉनिटरींग सेलची स्थापना करुन फेसबुक , व्हॉट्सअॅप , इन्स्टाग्रॅम , ट्विटर यासारख्या समाजमाध्यमांवर करडी नजर ठेवुन संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात आली . > व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तक्रार निवारण दिन कोविड 19 प्रादुर्भावाचे अनुषंगाने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नागरिकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तक्रार निवारण दिन घेवुन त्यांचे तक्रारींचे निराकरण करण्यात आले . दुर्बल घटकांसाठी केलेली कामे 1. घरगुती हिंसाचार हेल्पलाईन सेल दि .16 / 4 / 2020 रोजी बीड जिल्ह्यातील नागरिकांकरिता जिल्हा पोलीस दलातर्फे घरगुती हिंसाचार हेल्पलाईन सेलची स्थापना करण्यात आली . यामध्ये 1 ) जेष्ठ नागरिक हेल्पलाईन ( पोउपनि सरस्वती राठोड ) यावर 2 कॉल्स प्राप्त व निर्गती , 2 ) बालकांसाठी हेल्पलाईन ( पोउपनि राणी सानप ) कॉल्स - निरंक , 3 ) महिलांसाठी हेल्पलाईन ( सपोनि सुषमा पवार ) - 27 कॉल्स प्राप्त व निर्गती . 2. प्रोजेक्ट कवच हैद्राबाद येथील डॉक्टर युवतीवरील अमानुष बलात्कार व खुन प्रकरणानंतर बीड पोलीसांनी जिल्ह्यातील काम करणाऱ्या महिला व युवतींसाठी प्रोजेक्ट कवच नावाने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेण्यात आला . यामध्ये रात्री 09.00 ते सकाळी 06.00 या वेळेत कोणी महिला तिचे कामाचे ठिकाणाहुन अथवा अन्य कारणांनी तिचे घरी जात असेल व तिला असुरक्षित वाटत असल्यास तिने पोलीसांशी संपर्क साधल्यास तिस सरकारी पोलीस वाहनातुन तिचे घरी सुरक्षितरित्या पोहोचवण्यात येते . या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 6 महिलांना मदत करण्यात आली . 3. प्रोजेक्ट सहायता लॉकडाऊन कालावधीमध्ये जिल्ह्यातील नागरिक मानसिक ताणतणाव व डिप्रेशन यास बळी पडु नयेत याकरिता हा उपक्रम सुरु करण्यात आला . या अंतर्गत पोलीस प्रशासनास 5 कॉल्स प्राप्त झाले व सदर व्यक्तींना शासकीय रुग्णालय बीड येथील मानसोपचार तज्ञांची मदत व समुपदेशन प्राप्त करुन देण्यात आले .

Sharing

Visitor Counter