जिल्हयातील खरीप पिक कर्ज पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

जिल्हयातील खरीप पिक कर्ज पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन
बीड/प्रतिनिधी
जिल्हयातील खरीप पिक कर्ज पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की , ज्यांनी कदाही कर्ज घेतलेले नाही , अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे . व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत , अशा सर्व तकऱ्यांनी संबंधीत बँकेकडे खरीप पिक कर्ज मागणीसाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत.जे शेतकरी ३० सष्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतक - यांचे अर्ज बॅकांनी स्विकारावेत . जे बॅक व्यवस्थापक अर्ज स्विकारणार नाहीत किंवा स्विकारण्यास टाळाटाळ करतील अशा बँक व्यवस्थापका विरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल . तसेच ज्या शेतकऱ्यांनी व शेतक - यांची माहिती तलाठी व सोसायटी यांच्या मार्फत बँकेला दिलेली आहे . व पात्र शेतकऱ्यांचे अर्ज संबंधीत बँकेकडे प्रलंबीत आहेत . अशा बँक व्यवस्थापकांनी पिक कर्जास पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची कार्यवाही जलद गतीने करावी . यात हयगय करणा - या बँक व्यवस्थापकांवर नियमानुसार कार्यवाही अनुसरण्या येईल , यांची गंभीर नोंद सर्व व्यवस्थापकांनी घ्यावी .
