मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी - अॅड. सुभाष राऊत

Beed

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी - अॅड. सुभाष राऊत

समता परिषदेची विभागीय आयुक्तांकडे मागणी

बीड / प्रतिनिधी 
 
कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी महापूर अश्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.या वर्षी शेतकऱ्यांना शेतात कापूस, सोयाबीन, तुर, भुईमुंग, भाजीपाला हे पीके चांगली आली होती. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे ही सर्व पिके वायाला गेली असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने सर्व पिकांची नासाडी झाली आहे. तरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत तसेच मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा तथा बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांनी केली आहे.
मराठवाड्यात सुरुवातीपासूनच चांगला पाऊस असल्याने कापसाला व सोयाबीन ,भुईमुंग, भाजीपाला या पिकांचे यंदा चांगले उत्पन्न होईल अशी अशा शेतकऱ्यांना होती मात्र निसर्गाने घात केला. अतिवृष्टी व वारे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभे असणारे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऊस भुईसपाट झाला आहे व कापसाचे बोंड सडायला सुरुवात झाली आहे. भुईमूग, भाजीपाला व अन्य अंतर्गत पिके पिवळी पडून सडू लागली आहेत. बाजरी जमीनदोस्त झाली आहे. अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी केंद्र व राज्य सरकारने तात्काळ मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी समता परिषदेचे मराठवाडा विभागीय तथा बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांनी विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.

Sharing

Visitor Counter