एक वर्षाच्या बालकाने केली कोरोना वर मात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सर्वत्र होतेय कौतुक

एक वर्षाच्या बालकाने केली कोरोना वर मात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सर्वत्र होतेय कौतुक
किल्ले धारूर/इरफान शेख
धारूर येथील कोवीड १९ केअर सेंटर मधून एक वर्षाचा बालक वरद सतीश पोतदार याने कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर मात केली आहे
धारूर येथील किल्ले धारूर पत्रकारसंघाचे उपाध्यक्ष सतीश पोतदार हे कोरोना पॉजीटीव्ही आढळले होते त्यांच्या सोबत त्यांचा एक वर्षाचा मुलगा वरद पोतदार हा देखील पॉजीटीव्ह आला होता सर्वांना या लहान गोंडस बालकाची चिंता वाटत होती.
कोविड केअर सेंटर मधील सर्व वैद्यकीय कर्मचारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन शेकडे, डॉ चेतन आदमाने, डॉ तफिल तांबोळी, डॉ अमोल दुबे, डॉ पुजदेकर , डॉ तेजस्विननेहरकर, डॉ सोनिया मुंडे, वार्ड बॉय अंकुश घार्गे समाधान जाधव तसेच कोविड सेंटर म्यानेजर पुजारीव इतर स्टाफ या सर्वांनी लहान बालकांची काळजी घेऊन योग्य उपचार करून कोरोना तून मुक्तता केली यामुळे सर्व वैद्यकीय कर्मचारी सेंटरमधील स्टॉप या सर्वांचे धारूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे लहान बालक सेंटरमध्ये दहा दिवस राहिल्याने सर्वांनाच त्याच्याविषयी आपुलकी जडली होती वरद पोतदार ने कोरोणा सारख्या भयंकर आजारावर मात केल्याने त्याचे ही सर्वत्र अभिनंदन होत आहे.
